शॉप ऍक्ट बद्दल माहिती जाणून घेऊ शॉप ऍक्ट परवाना(license ) म्हणजे काय?

sakar multimedia services

शॉप ऍक्ट बद्दल माहिती जाणून घेऊ  शॉप ऍक्ट परवाना(license ) म्हणजे काय?

शॉप ऍक्ट म्हणजे त्यालाच गुमास्ता असे देखील म्हणतात.शॉप ऍक्ट हि महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्याची आवश्यक असलेली नोंदणी आहे.हे महाराष्ट्र नगरपालिका किंवा महानगरपालिकाद्वारे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत शासित आहे.शॉप ऍक्ट हे एक प्रमाणपत्र आहे जे आपला व्यवसाय एका विशिष्ट ठिकाणी करण्याचा अधीकार प्राप्त करून देते.

शॉप ऍक्ट चा वापर का असतो असतो?

हा एक कायदा अंतर्गत बनलेला परवाना आहे ज्या मध्ये व्यवसायाचे मालकी हक्क, व्यवसाय/दुकानाची भागीदारी, कामगारांचे पगार, कामाचा तास, व्यवसायात/दुकानात काम करणाऱ्या लोकांची संख्या व इतर कामाच्या अटी व नियम पालन करण्यासाठी आहे.

शॉप ऍक्ट परवाना असणे अनिवार्य आहे का?

हो,जर तुमचा व्यवसाय/दुकान महापालिका हद्दीत/ परिसरात असेल तर शॉप ऍक्ट परवाना अनिवार्य आहे.जर तुमचा व्यवसाय घरी असेल आणि महापालिका परिसरात असेल तर शॉप ऍक्ट असणे अनिवार्य आहे

 

हे सुद्धा पहा :- LIC ची ही पॉलिसी FD पेक्षा जास्त परतावा देते, परिपक्वता झाल्यावर 27 लाख मिळतील, प्रीमियम एकदाच भरावा लागेल

शॉप ऍक्ट परवाना कुठे काढावे व लागणारी कागदपत्रे कोणती ?

शॉप ऍक्ट परवाना हे आपले सरकार या पोर्टल वर जाऊन काढता येतो. या बद्दल youtube वर भरपूर असे video उपलब्ध आहे. तरीही काढण्यात अडथडा येत असेल तर जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा अमच्या www.sakar.me या वेबसाइट वर कमेंट (comment) कीवा website वरिल contact नंबर वर संपर्क साधु शकता

लागणारी कागदपत्रे

१.आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग परवाना / पॅन.

२.मालकाचा फोटो.

३.मालकासह शॉपचा फोटो (आपण मोबाइल फोनवर देखील क्लिक करू शकता)

४.भाड्याने घेतलेला करार, भाड्याने घेतल्यास.

५.वीज बिल.

शॉप ऍक्ट परवाना साठी किती पैसे लागतील?

तसे पाहतो म्हटलं तर शॉप ऍक्ट परवाना तुम्ही स्वतः हा काढत असेल तर फक्त २३ रुपयात काढता येतो. पण काही खाजगी किंवा mahaonline केंद्रवर त्याची काढून देण्याची किंमत वाढू शकतो.

 

 

शॉप ऍक्ट बद्दल किंवा व्यवसाय बद्दल पुन्हा काही प्रश्न असल्यास प्रश्न कंमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता, माहिती आवडल्यास नक्की share करा